Video : काय?? सारा अली खानची बोलती बंद

व्हिडीओ शेअर करत साराने मागितली चाहत्यांची माफी

अभिनेत्री सारा अली खान कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. यात अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. विशेष म्हणजे यावेळी तिने थेट रुग्णालयातील एक व्हिडीओ  शेअर केला आहे.

साराने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. साराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिला स्पष्टपणे बोलता येत नसल्याचं दिसून येत आहे. मोठ्या कष्टाने अडखळत तिने दवाखान्यात येण्याचं कारण सांगितलं आहे. स्पष्ट बोलता येत नसल्यानं तिने चाहत्यांची माफीदेखील मागितली आहे.

अक्कल दाढ काढण्यासाठी सारा अली खान दाताच्या दवाखान्यात गेली होती. यावेळी तिने रुग्णालयातून तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. दात काढण्याआधी भूलीचं इंजेक्शन दिल्यानं साराला स्पष्ट बोलणं शक्य होतं नव्हतं. तरीही सारानं बोबड्या शब्दात आपण अक्कल दाढ काढत असल्याचं सांगितलं. भूल दिल्यानं साराची अवस्था इतकी वाईट झाली होती की तिला स्पष्ट बोलणं ही शक्य होत नव्हतं. दात काढल्यानंतर तर साराची बोलतीच बंद झाली. अशा अवस्थेतही तिने डॉक्टरांचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अनेक कमेंटस् आल्या आहेत. काही चाहत्यांनी साराला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. तर काही चाहत्यांची चांगला अभिनय जमतोय असं म्हणत साराची खिल्ली उडवलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sara ali khan at hospital for surgery kw

ताज्या बातम्या