“मी फक्त ९ वर्षांची होते तेव्हाच…”, अमृता आणि सैफच्या घटस्फोटावर साराचा खुलासा

अमृता आणि सैफने घरातील लोकांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चित्रपटांसह तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी उघडपणे सांगते. साराने कधीच कोणती गोष्ट चाहत्यांपासून लपवलेली नाही. सारा लहान असताना आई-वडील सैफ अली खान आणि अमृता सिंग दोघे विभक्त झाले होते. नुकतंच साराने त्यांच्या नात्याबद्दल काही गौप्यस्फोट केले आहे. जेव्हा माझे आई-वडील एकत्र राहायचे, तेव्हा ते एकमेकांवर फार नाराज असायचे, असे साराने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

नुकतंच साराने एका प्रसिद्ध मॅग्झिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या आई-वडिलांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ती म्हणाली, “मी फार लहान असतानाच मॅच्युअर झाली. जेव्हा मी फक्त ९ वर्षांची होती तेव्हाच मला माझे पालक एकत्र आनंदी नाहीत, हे समजत होतं. मात्र ते दोघे जेव्हा विभक्त झाले, त्यानंतर ते दोघेही फार आनंदात राहू लागले. कदाचित माझी आई त्या १० वर्षात हसणंच विसरली होती. पण अचानक ती फार आनंदी राहू लागली. ती सुंदर दिसू लागली आणि जर माझे आई-वडील वेगळे होऊन आनंदात राहत असतील तर मग मी दु:खी का होऊ? मला त्यात काहीही अवघड वाटत नाही,” असे साराने सांगितले.

यापुढे सारा म्हणाली, “आता ते दोघेही पूर्वीपेक्षा खूप सकारात्मक आणि आनंदी आहेत. मी माझ्या आईला हसताना, विनोद करताना पाहते. मात्र काही वर्षांपासून तिने हे सर्व गमावले होते. माझ्या आईला पुन्हा असे पाहणे खूप दिलासादायक आहे. माझी आई अमृता आणि वडील सैफ अली खान यांचा वेगळे होण्याचा निर्णय हा योग्य वेळी घेतलेला होता,” असेही ती म्हणाली.

अमृता आणि सैफची ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. या चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होता. अमृता आणि सैफने घरातील लोकांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करीना सैफ पेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan comment on relations between her parents amrita singh saif ali khan divorce nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन