scorecardresearch

आलिशान गाड्यांना डावलून सारा अली खानने केला ऑल्टो गाडीतून प्रवास, कारण ऐकून व्हाल थक्क

अनेकदा ती तिच्या नम्र आणि निरागस स्वभावने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

आलिशान गाड्यांना डावलून सारा अली खानने केला ऑल्टो गाडीतून प्रवास, कारण ऐकून व्हाल थक्क

सारा अली खान मनोरंजनसृष्टीतील एक दिलखुलास अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या नम्र आणि निरागस स्वभावने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. फिटनेसप्रेमी असलेली सारा बऱ्याचदा जिममध्ये जाताना तेथे उपस्थित तिच्या चाहत्यांशी, मीडिया रिपोर्टर्सशी संवाद साधते. असाच जिममधून परततानाचा तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. परंतु यावेळी साराकडे लक्ष वळण्याचं कारण नेहमीपेक्षा वेगळंच आहे.

आणखी वाचा : जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, चर्चा मात्र बॉबी देओलची? जाणून घ्या कारण

नुकतीच सारा जिममधून बाहेर येताना दिसली. यावेळी तिने जिमचा आऊटफिट घातला होता. गुलाबी शाॅर्ट आणि पांढरा टॉप अशा स्पोर्ट लूकमध्ये ती होती. गाडीकडे जात असताना तिने कॅमेऱ्यांना पोजही दिली. त्यानंतर जे घडलं त्याने सर्वजण आवाक् झाले. सगळ्यांचं लक्ष बाजूला उभ्या असलेल्या ऑल्टो गाडीकडे वाळलं. फोटोग्राफर्सना पोज दिल्यानंतर सारा तेथून निघाली आणि थेट त्या ऑल्टोमध्ये जाऊन बसली. इतकी प्रसिद्ध अभिनेत्री असूनही आलिशान गाड्यांमधून प्रवास करण्याचं सोडून सारा तिच्या ऑल्टोने जिमला आली होती. साराकडे महागड्या गाड्यांबरोबरच ही गाडीही आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमुळे काहींनी तिच्या नम्रपणाचे कौतुक केलं, तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे लोकही स्वस्त कार्समधून फिरतात! कमाल आहे.” तर आणखीन एका नेटकरी म्हणाला, “हा सेलिब्रिटींचा पब्लिसिटी फंडा आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “साराने ऑल्टोमध्ये प्रवास केला म्हणजे आता या गाडीची विक्री चांगलीच वाढणार.”

हेही वाचा : अभिनेत्री सारा अली खान दिसणार देशभक्तीपर चित्रपटात, साकारणार ‘ही’ भूमिका

दरम्यान, सारा अली खान ही तिच्या आणि क्रिकेटर शुभम गिलच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली होती. ‘आतारंगी रे’ चित्रपट अपयशी ठरल्यानंतर ती आता धर्मा प्रोडक्शनच्या आगामी ‘ए वतन.. मेरे वतन’ या चित्रपटात स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-10-2022 at 09:10 IST

संबंधित बातम्या