Video: तुमचं नाव काय? असं विचारणाऱ्याला साराने दिलेलं उत्तर पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

सध्या साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Sara Ali Khan, Sara Ali Khan viral video, Sara Ali Khan airport video, Sara Ali Khan news, Sara Ali Khan updates, Sara Ali Khan next movie, Sara Ali Khan next film, Sara Ali Khan atrangi re
(PHOTO CREDIT: viral bhayani instagram)

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान ही सतत चर्चेत असते. साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. साराचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे.

एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने साराचा विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा तिच्या आईसोबत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट जीन्स परिधान केली आहे. त्यावर साराने काळ्या रंगाचा मास्क लावला आहे. या लूकमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे. सारा विमानतळाच्या बाहेर आईसोबत रांगेत उभी असते. तिच्या मागे उभे असणाऱ्या एका व्यक्तीने तुमचं नाव काय? असा प्रश्न साराला विचारला आहे. ते ऐकून साराला हसू येते आणि शांतपणे त्या व्यक्तीला उत्तर देते ‘सारा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

सारा VIP एण्ट्रीने विमानतळावर जाण्याऐवजी इतर लोकांप्रमाणेच रांगेत उभे राहून विमानतळावर जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच रांगेत उभे असेल्या एका व्यक्तीला साराने शांतपणे दिलेले उत्तर पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. ‘सारा खूप चांगली मुलगी आहे. तिच्या आईने तिच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत’ असे एका यूजरने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sara ali khan ditches vip entrance at airport avb