scorecardresearch

सारा अली खानच्या ब्रेकअपवर आई अमृता सिंहने ‘या’ दोन शब्दांत दिलेली प्रतिक्रिया; अभिनेत्रीनेच केला खुलासा

सारा अली खानने एका मुलाखतीदरम्यान तिच्या ब्रेकअपवर तिची आई अमृताने कशी प्रतिक्रिया दिली याचा खुलासा केला आहे.

sara-ali-khan
साराच्या ब्रेकअपवर अमृता सिंगची काय होती प्रतिक्रिया (छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

सारा अली खान सध्या तिचा आगामी चित्रपट गॅसलाइटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टारवर ३१ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत साराने सांगितले की तिची आई अमृता सिंगने तिच्या ब्रेकअपवर कशी प्रतिक्रिया दिली. तसेच साराने तिचे वडील-अभिनेता सैफ अली खान २०२० मध्ये आलेल्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणायचे? याबातही खुलासा केला आहे.

हेही वाचा- “तुला लाज वाटली पाहिजे” तापसी पन्नूने घातलेल्या नेकलेसमुळे नेटकरी संतापले; नेमकं कारण काय?

ब्रेकअपनंतर अमृता सिंगची काय होती प्रतिक्रिया?

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा साराला विचारण्यात आले की, ब्रेकअपनंतर आई अमृता सिंग काय म्हणाली? या प्रश्नावर सारा म्हणाली माझ्या ब्रेकअपनंतर माझी आई फक्त “ठीक आहे” म्हणाली. सारा तिचा ‘लव्ह आज कल’ को-स्टार कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नव्हता किंवा ते नाकारलेही नव्हते.

हेही वाचा- किरण खेर यांना करोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

‘लव्ह आज कल’च्या अपयशावर सैफ अली खान काय म्हणाला

‘लव्ह आज कल’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्याचे वडील सैफ यांची प्रतिक्रिया काय होती, असे विचारले असता? यावर सारा म्हणाली, “तो आनंदी नव्हता. त्याला परफॉर्मन्स आवडला नाही. तो म्हणाला की ते चांगले नाही.” इम्तियाज अलीचा पहिला रिलीज ‘लव आज कल’ (२००९) होता. या चित्रपटात दीपिका पदुकोणने सैफ अली खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात ऋषी कपूर, गिसेली मॉन्टेरो आणि इतरांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. तब्बत ११ वर्षांनंतर, इम्तियाज अलीने सारासोबत लव आज कल (२०२०) दिग्दर्शित केला. या चित्रपटात कार्तिक आर्यनने सारासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

हेही वाचा- …अन् शाहरुखच्या ‘या’ चित्रपटात राणी मुखर्जीने ऐश्वर्याला केलं रिप्लेस; सेटवर नेमकं काय घडलं होतं

साराचे आगामी चित्रपट

सारा लवकरच पवन कृपलानी दिग्दर्शित ‘गॅसलाइट’मध्ये दिसणार आहे. सारा लक्ष्मण उतेकरचा अनटायटल रोम-कॉम चित्रपटातही कमा करत आहे. ज्यामध्ये विकी कौशल तिचा सह कलाकार आहे. तसेच होमी अदजानियाच्या पुढील ‘मर्डर मुबारक’मध्ये करिश्मा कपूरसोबत सारा दिसणार आहे. करण जोहरचा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटात सारा एका शूर स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर ती अनुराग बसूचा ‘मेट्रो इन डिनो’ चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या