अमृता आणि सैफच्या घटस्फोटावर सारा अली खानची प्रतिक्रिया, म्हणाली ‘हे खूप…’

२००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला.

sara ali khan, saif ali khan, amrita sing, sara ali khan on parents divorce, celebrity divorce,
साराने नुकत्याच एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सारा आली खान. सारा ही बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर सारा आई अमृता सिंहसोबत राहात आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात साराने आई-वडिलांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

साराने नुकतीच वूटच्या ‘फीट अप विथ द स्टार्स’ सिझन ३ या शोमध्ये हजेरी लावली. या शोच्या आगामी भागामध्ये ती तिच्या व्यवसायिक तसेच खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसणार आहे. दरम्यान साराने आई-वडीलांच्या घटस्फोटानंतर स्वत:ला कसे सांभाळले हे देखील सांगितले आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानने हनी सिंगच्या लगावली होती कानशिलात?; पत्नी शालिनीनं सांगितलं केला होता खुलासा

‘हे खूप सोपे होते. तुम्हाला दोन पर्याय दिसत असतील त्यातील एक पर्याय म्हणजे जिकडे कुणीही आनंदी नाही आणि दुसरा पर्याय म्हणजे सगळेजण वेगवेगळे राहून आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. एकमेकांना कधीतरी भेटल्यावर तुम्हाला प्रचंड आनंद होतो’ असे सारा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

पुढे सारा म्हणाली, ‘मी माझ्या आईसोबत राहते. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझे वडील फोनच्या माध्यमातून नेहमी माझ्याशी बोलत असतात आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्यांना बिनधास्तपणे जाऊन भेटू शकते. मला नाही वाटायचे ते दोघे एकमेकांसोबत आनंदी नाहीत. त्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा योग्य निर्णय घेतला.’

अमृता आणि सैफची ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. या चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होता. अमृता आणि सैफने घरचांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करीना सैफ पेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan reveals how she dealt with parents saif and amrita divorce avb

ताज्या बातम्या