“तुम्ही फोटो कसले काढताय, इथे माझा फोन हरवलाय,” सारा अली खान फोटोग्राफर्सवर संतापली

सध्या साराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सारा आली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. सारा अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सध्या साराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यात ती अचानक गाडीतून उतरुन सर्व पापराझींसमोर धावत जाताना दिसत आहे. तिच्या पळण्यामागे कारणही समोर आले आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी याने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सारा ही गाडीत बसलेली दिसत आहे. मात्र अचानक ती गोंधळलेली पाहायला मिळत आहे. यानंतर उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सने तिला कारण विचारले असता ती म्हणाले, “अरे माझा मोबाईल हरवलाय.” असे बोलत असतानाच ती धावतच स्टुडिओमध्ये जाताना दिसत आहे.

यानंतर स्टुडिओकडे जात असताना काही फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत असतात. त्यावर ती रागवलेल्या आवाजात त्यांना सुनावते. “अरे तुम्ही माझे फोटो कसले काढताय? इथे माझा फोन हरवला आहे.” त्यानंतर ती स्टुडिओमध्ये जाते आणि काही सेकंदात ती बाहेर येत गाडीत बसते. तेव्हा तिला फोटोग्राफर्स विचारतात “तुला फोन मिळाला का?” त्यावर ती ‘हो’ असे सांगते.

हेही वाचा : “तुला लेडी आमिर खान म्हणू का?” क्रिती सेनॉन म्हणते, “माझ्यावर इतका दबाव…”

दरम्यान साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर साराचे अनेक चाहते हे नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan rushes out of car looking for her lost phone gets upset with paparazzi video viral nrp

ताज्या बातम्या