बिनधास्त साराचा बोल्ड लूक पाहिलात का?

साराचे हे फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल..

sara ali khan,
सारा अली खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच साराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. साराच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ४ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. साराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत ‘काश कभी यूं हो न हसरतें न जुनून हो, तेरा खयाल हो और तु हो दिल में बस सुकून हो।’, असे कॅप्शन दिले आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. साराच्या या फोटोला १५ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

आणखी वाचा : VIDEO: ‘मी काय कुंद्रा आहे का?’ पाहा असं का म्हणाले राज ठाकरे

दरम्यान, सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषही आहे. याशिवाय सारा ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आदित्य धर करणार आहेत. या आधी सारा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली होती. तर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sara ali khan shared her latest photo shoot went viral dcp