वजनदार सारा फिट कशी झाली?; पाहा व्हिडीओ

सारा अली खानने सांगितली तिची वेट लॉस जर्नी

सारा अली खान बॉलिवूडमधील अत्यंत फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या फिटनेसची चाहत्यांमध्ये चर्चा असते. परंतु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सारा आजच्या इतकी फिट नव्हती. किंबहूना ती बरीच स्थूल होती. मात्र तिने मेहनत, वर्कआऊट, योग्य आहार घेऊन स्थूलतेवर मात केली. साराने आपल्या फॅट टू फिट या प्रवासाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

Episode 2: From Sara ka Sara to Sara ka aadha

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तिचा स्थूल अवतार दिसत आहे. त्यावेळी तिचं वजन ९६ किलो इतकं होतं. त्यानंतर व्यायाम करुन ती कशी फिट झाली? हा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिने आपलं वर्कआऊट शेड्युल्ड चाहत्यांना सांगितलं आहे. ती विविध प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने चाहत्यांना व्यायाम करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

सारा अली खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी साराने घेतलेल्या या मेहनतीचे प्रचंड कौतुक केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan shares her weight loss journey mppg

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या