सारा अली खानने शेअर केला सैफ अली खानसोबतचा फोटो, म्हणाली…

तिचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती वडिल सैफ अली खानसोबत असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

वडिल आणि मुलीमधील नाते नेहमी खास असते हे साराने शेअर केलेल्या कॅप्शनवरुन समजत आहे. या फोटोमध्ये सारा अतिशय क्यूट दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने ‘मुलगी आणि वडिल यांची बेस्ट जोडी’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘वडिल आणि मुलीमध्ये असलेले सुंदर नाते’ असे म्हटले आहे.

‘एक असा व्यक्ती जो प्रेमाचे प्रतिक आहे आणि माझ्या आयुष्यातील खरा मिकी माऊस आहे’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

सारा ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी आहे. तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटात तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘लव आज कल’, ‘सिंबा’ या चित्रपटांमध्ये काम केले. आता तिचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sara ali khan shares photo with father saif ali khan avb