सर जो तेरा चकराए! ‘फिट’ साराचा ‘फॅट’ व्हिडीओ व्हायरल

या थ्रो-बॅक व्हिडीओमध्ये साराला ओळखणंही कठीण आहे.

रुपेरी पडद्यावरील कलाकारांचा प्रेक्षकांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात नक्कीच फरक पडत असतो. यातील काही व्यक्तिरेखांचा प्रवास आपल्याला प्रेरणादायी वाटतो. असेच एक व्यक्तीमत्त्व सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कमी वयात या अभिनेत्रीने मेहनत, वर्कआऊट करून स्थूलतेचा न्यूनगंड बाळगणाऱ्यांसमोर एक उदाहरण सादर केले आहे. ही अभिनेत्री आहे सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या थ्रो-बॅक व्हिडीओमध्ये साराला ओळखणंही कठीण आहे. विमानातून प्रवास करताना तिने स्वत:च हा व्हिडीओ शूट केला होता. सारा आता जरी अत्यंत सुंदर आणि फिट दिसत असली तरी बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी तिला अनेकदा स्थूलपणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी तिचे वजन ९६ किलो इतकं होतं. साराचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

Throw to when I couldn’t be thrown #beautyinblack

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून व्हिडीओतील मुलगी सारा अली खान आहे यावरच विश्वास बसत नाही आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sara ali khan shares throwback video mppg

ताज्या बातम्या