पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच साराचा दिग्दर्शकांना दगा?

‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर सारावर नाराज

sara ali khan
सारा अली खान

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या त्याच्या शूटिंगमध्ये सारा व्यग्र आहे. एकीकडे पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच साराने आणखी एक चित्रपट साईन केल्याची माहिती समोर येत आहे. अनुष्का शर्माच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचं कळतंय.

‘क्रिअर्ज एन्टरटेन्मेंट’ आणि ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाचं नाव आणि त्यासंदर्भातील माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केदारनाथ या चित्रपटाची निर्मितीसुद्धा ‘क्रिअर्ज एन्टरटेन्मेंट’ करत आहे. याचाच फायदा साराला झाला असावा, असं म्हटलं जात आहे. सारा आणि या प्रॉडक्शन हाऊसमध्ये चर्चासुद्धा झाली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळलं.

Padmavati Controversy : भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर मात्र साराच्या या निर्णयाने फारसे खुश नाहीत. पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सारा तिच्या दुसऱ्या चित्रपटासाठीच जास्त उत्सुक असल्याने अभिषेक नाखूश असल्याचं कळतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan signs film under anushka sharma banner before kedarnath release