‘दिल्लीतील इंडिया गेटपासून बिहारच्या शेतापर्यंत…’, साराचा ‘नमस्ते दर्शको’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

साराने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

sara ali khan, sara ali khan viral video,
साराचा 'नमस्ते दर्शको' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराचे लाखो चाहते आहेत. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि विनोदी व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. साराने गेल्या काही दिवसांपासून ‘नॉक नॉक’ आणि ‘नमस्ते दर्शको’ची जणू काही सीरिज सुरु केली आहे. आता नुकताच साराने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत साराने तिच्या चाहत्यांना आपल्या भारताची एक सफारी दाखवली आहे.

साराने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ही इंडिया गेटच्या समोरून सगळ्या प्रेक्षकांना नमस्ते बोलते. त्यानंतर सारा बिहारमध्ये असल्याचे दिसते. तिथे साराने तिच्या डोक्यावर गवताचा पेंढा घेतल्याचे दिसत आहे. यानंतर सारा जयपुरमधून सगळ्यांना नमस्कार करते. यावेळी ती ब्लो-ड्राय करत असल्याचे दिसते. नंतर सारा हिमाचल प्रदेशातील सांगला या ठिकाणी असल्याचे दिसते. तेथून ती सगळ्यांना बर्फाचे डोंगर दाखवते. यानंतर वैष्णो देवी, बनासर, ऋषिकेश आणि मग गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सारा गेली होती. त्यावेळी तिने तिथून हे ‘नमस्ते दर्शको’चे व्हिडीओ शेअर केले होते. मात्र, आता तिने या सगळ्या व्हिडीओंचा एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘नमस्ते दर्शको दिल्लीच्या इंडिया गेटपासून बिहारच्या शेतापर्यंत…’, असे कॅप्शन साराने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या आधी साराने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या नाकाला जखम झाली असल्याचे सांगितले होते. या विषयी सांगण्यासाठी ही साराने एक विनोदी व्हिडीओ शेअर केला होता.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

दरम्यान, सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषही आहे. याशिवाय सारा ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आदित्य धर करणार आहेत. या आधी सारा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली होती. तर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan takes you on a tour of india in her new namaste darshako video went viral dcp

ताज्या बातम्या