Live ‘टीव्ही शो’वर या अभिनेत्रीच्या ड्रेसने दिला धोका

‘वॉच व्हॉट हॅपन्स लाइव्ह’ नावाच्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती.

सारा जेसिका पार्कर
सारा जेसिका पार्कर

 

एखाद्या कार्यक्रमात अचानक ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगामुळे त्या व्यक्तीला अतिशय ओशाळवाणं वाटते. नामवंत व्यक्तींबाबत घडलेली अशी एखादी घटना आजच्या सोशल मीडियाच्या युगात क्षणात व्हायरल होते. परंतु, काहीजण अशा ओशाळवाण्या प्रसंगाला धडाडीने तोंड देत कार्यक्रमातील आपली भूमिका योग्यप्रकारे पार पाडताना दिसतात. यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे ‘वॉर्डरोब मालफंक्शन’चा. याआधीदेखील अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली असून, अलीकडे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा जेसिका पार्करवर असा प्रसंग ओढवला. लाइव्ह टीव्ही शो दरम्यान ती ‘वॉर्डरोब मालफंक्शन’चा शिकार झाली.
‘वॉच व्हॉट हॅपन्स लाइव्ह’ नावाच्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. साराचा ड्रेस बाहीवर उसवला होता. तो लपविण्यापेक्षा कुठलाही संकोच न करता तिने ड्रेसचा उसवलेला भाग सूत्रसंचालक एण्डी रोहेन आणि दर्शकाना दाखविल्याचे ‘एसशोबिझ डॉट कॉम’ संकेतस्थळाच्या वृत्तात म्हटले आहे. ‘डिवोर्स’ या आपल्या नव्या शोच्या प्रचारासाठी ती या कार्यक्रमात सहभागी झाली होती. भारतात १७ ऑक्टोबरला या शोचा प्रिमियर ‘स्टार वर्ल्ड प्रिमियर एचडी’वर होणार आहे.
तू परिधान केलेला ड्रेस छान आहे, परंतु हे याच्याबरोबर काय झाले आहे, असे म्हणत सूत्रसंचालक कोहेनने साराला ड्रेसबाबत छेडले. हा ड्रेस आपल्याला आवडत असून, आपण तो उधार घेतला असल्याचे साराने सांगितले. आता जेव्हा तो फाटलाचं आहे, तर तो आपल्याला अधिकच आवडायला लागला असल्याचे ती पुढे म्हणाली. याआधीदेखी सारा अनेकवेळा अशा घटनांची शिकार झाली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘आँखे २’ चित्रपटाची अभिनेत्री रेजिना कॅसन्ड्रादेखील ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ची शिकार झाली होती. ‘आँखे २’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च कार्यक्रमादरम्यान तिच्यावर हा प्रसंग ओढवला होता. रेजिना मंचावर नृत्य सादर करत हेती. तिने काळ्या रंगाचा जाळीदार पोशाख परिधान केला होता. नृत्य करताना तिचा ड्रेस सरकल्याने तिच्यावर नको तो प्रसंग ओढवला. त्या स्थितीतदेखील तिने आपले नृत्य सुरूच ठेवले. तिने परिधान केलेला ड्रेस संपूर्ण जाळीदार असल्याने कदाचीत तो जास्त वेळ टिकू शकला नाही आणि तिच्यावर ओशाळवाणा प्रसंग उदभवला.

रेजिना कॅसन्ड्रा
रेजिना कॅसन्ड्रा

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sarah jessica parker handles her wardrobe malfunction like a pro