छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘भाबीजी घर पर है.’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच मालिकेतील प्रत्येक पात्र हे सतत चर्चेत असते. जवळपास पाच वर्षांनंतर मालिकेत गोरी मेमची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडने मालिका सोडली. त्यानंतर ती बिग बॉस १४ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सौम्याने याबाबत वक्तव्य केले आहे.

नुकताच सौम्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते… मी बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकत नाही. कृपया अफवा पसरवणं बंद करा आणि त्यावर लिहिणे देखील बंद करा. मी बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाही. या आशयाची पोस्ट सौम्याने केली आहे.

सौम्या गेली पाच वर्षे भाबीजी घर पर है या मालिकेत गोरी मेमही भूमिका साकारत होती. ही मालिका सोडल्यानंतर ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील भाबीजी या मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. कोहली आणि संजय जी हे खूप चांगले निर्माते आहेत. त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. मी आणि बेनफिर खूप चांगल्या मैत्रीणी आहोत.’