वर्षाअखेरीस गायिका सावनी रविंद्र चाहत्यांना देणार सुरेल भेट

जाणून घ्या सविस्तर..

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे ‘सावनी रविंद्र.’ लॉकडाउननंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती. सावनी सोशल मिडीयावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच तिने केलेले फोटोशूट देखील चर्चेत होते. आता वर्षाच्या शेवटी सावनी चाहत्यांना एक भेट देणार आहे.

गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक सुरेल भेट देणार आहे. याविषयी ती म्हणते, ”२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल.”

सावनीने मराठीसह हिंदी, तमिळ गुजराती, बंगाली, कोंकणी या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचा चाहता वर्ग केवळ भारतातच नव्हे तर जगभर असल्याचे पाहायला मिळते. या चाहत्यांसाठी सावनी वर्षाअखेरीस एक नवे गाणे घेऊन भेटीला येणार आहे. हे नवं गाणं कोणतं असणार हे पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Savaniee ravindrra going release new song at end of the year avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या