गेल्या काही दिवसांपासून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. अत्यंत धमाकेदार असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ म्हणजे काय याचं कोडं आता लवकरच सुटणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच मजेशीर होते. एक कॉलेज, त्याचं नाव आणि तिथे असलेले विद्यार्थी यांची मजेशीर कहाणी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्यासह दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकताच हा चित्रपट दाखवण्यात आला. महोत्सवात चित्रपटाला भरभरून दाद मिळाली. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या टीजरवरूनच हा चित्रपट अतिशय युथफूल, संगीतमय, कलरफुल आणि धमाल असेल असा अंदाज बांधता येतो. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे.

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

फटमार फिल्म्स प्रस्तुत इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची निर्मिती ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या सागर छाया वंजारी आणि अभिषिक्ता एन्फोटेन्मेंटच्या प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. तर विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई सहनिर्माते आहेत. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असल्यानं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.