"मला शक्य नाही, परत ये..." सायली संजीवची वडिलांसाठी खास पोस्ट | Sayali Sanjiv Emotional father death anniversary post on Instagram viral nrp 97 | Loksatta

“मला शक्य नाही, परत ये…” सायली संजीवची वडिलांसाठी खास पोस्ट

याबरोबर तिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

“मला शक्य नाही, परत ये…” सायली संजीवची वडिलांसाठी खास पोस्ट

मराठी मालिका आणि त्यानंतर चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सायलीचे वडील संजीव यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी ३० नोव्हेंबरला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. यानिमित्ताने सायलीनं तिची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सायलीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या वडिलांचा फोटो पोस्ट केला आहे. याबरोबर तिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

सायली संजीवची पोस्ट

“संजीव…
राहिले की एक वर्ष तुझ्याशिवाय.. खूप झालं बास..नाही शक्य..
आजही मला हवा आहेस तू.
परत ये ना… प्लीझ

साद हि घालते लाडकी तुला..
जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा..
बाबा…”, असे सायली संजीवने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती

दरम्यान सायलीचे वडील संजीव हे आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र ३० नोव्हेंबर २०२१ ला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. सायलीने काही दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी ती हर हर महादेव या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 08:48 IST
Next Story
फोटोग्राफीच्या नादात रविना टंडन अडचणीत? व्याघ्र प्रकल्पातील ‘तो’ Video समोर आल्यानंतर तपास सुरु; जाणून घ्या घडलंय काय