‘द फॅमिली मॅन’ फेम श्रेया धन्वंतरी आता तापसीसोबत ‘लूप लपेटा’ करणार

काही दिवसांपासून इंटरनेटच्या जगात झळकलेली श्रेया पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाची जादू पसरवणार आहे.

shreya-dhanwanthary -in-looop-lapeta-film
‘स्कॅम १९९२’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया धन्वंतरी आता अभिनेत्री तापसी पन्नू सोबत ‘लुप लपेटा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूसोबत ताहिर राज भसीन याची देखील मुख्य भूमिका असणार आहे. त्यामूळे काही दिवसांपासून इंटरनेटच्या जगात झळकलेली श्रेया पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाची जादू पसरवणार आहे.

अभिनेत्री श्रेयाने एका मुलाखतीत बोलताना हा खुलासा केलाय. ‘स्कॅम १९९२’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर तिच्यासमोर अनेक प्रोजेक्टच्या रांगा लागल्या होत्या. पण तिला पुढच्या प्रोजेक्टसाठी कोणतीही घाई करायची नव्हती. अशातच तिच्यापुढे ‘लूप लपेटा’ चित्रपटासाठीची ऑफर आली. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता ताहिर राज भासीन हे सावी आणि सत्याच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. त्या दोघांच्या भूमिकेच्या बरोबरीला असणाऱ्या ‘जुलिया’ भूमिकेसाठी लोकप्रिय आणि दमदार अभिनेत्रीचा शोध ‘लूप लपेटा’ चे निर्माता आयुष महेश्वरी घेत होते. अभिनेत्री श्रेयाने यापूर्वी एलिप्सिस एंटरटेनमेन्टसोबत काम केल्यामुळं निर्मात्यांना तिच्या अभिनय आणि लोकप्रियतेचा अंदाज आला होता. तसंच याच चित्रपटातील अभिनेता ताहिरसोबत श्रेयाने यापूर्वी 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वाय चीट इंडिया’ मध्ये एकत्र काम केलंय. त्यामूळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘जुलिया’च्या भूमिकेसाठी श्रेयाची निवड केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिप्सिस एंटरटेनमेंटचे तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर आणि आयुष महेश्वरी हे या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. तर आकाश भाटिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत. ‘लूप लपेटा’ हा एक कॉमेडी- थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या मेकींगपासूनच ‘लूप लपेटा’ बराच चर्चेत आलाय.

१९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रन लोला रन’ या जर्मन चित्रपटाचा ‘लूप लपेटा’ हा हिंदी रिमेक असणार आहे. आपल्या बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी एक मुलगी केवळ २० मिनीटांत कशा पद्धतीने पैशांची जुळवाजुळव करते हे या चित्रपटातू दाखवण्यात आलंय. येत्या 22 अक्टूबर रोजी थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Scam 1992 family man star shreya dhanwanthary play crucial role taapsee pannu tahir raj bhasins looop lapeta prp