Secret Superstar new poster: स्वप्नाळू झायरा आणि रॉकस्टार आमिरची झलक

‘ड्रीम देखना तो बेसिक होता है’

जेव्हापासून बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याचा आणि बालकलाकार झायरा वसीमच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत होती. गेल्यावर्षी या सिनेमाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला. पण चाहत्यांची उत्सुकता फार न ताणता आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या सिनेमाचा आणखी एक पोस्टर प्रदर्शित केला. यावेळी त्याने फक्त पोस्टरच प्रदर्शित केला असे नाही. तर आज संध्याकाळी ६.३० ते ६.४५ च्या दरम्यान या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या चाहत्यांना दिली.

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे शाहरुखला कोर्टाची नोटीस

या पोस्टरमध्ये झायरा वासिम शाळेच्या गणवेशात, गिटार वाजवताना स्वतःच्याच जगात रमलेली दिसते. तर दुसरीकडे आमिर खान एका रॉकस्टारच्या लूकमध्ये दिसतो. पोस्टरवर ‘ड्रीम देखना तो बेसिक होता है’ अशी टॅगलाइनही दिली आहे. झायरा एका लहान शहरात राहणारी मुलगी असते. पण म्हणून तिची स्वप्न काही लहान नसतात. तिला प्रसिद्ध गायिका व्हायचे असते पण तिच्या या मार्गात सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे तिचे वडील. पण म्हणून काही तिचं धैर्य खचत नाही. हिजाब घालत आणि नाव लपवत ती आपल्या आवाजातले व्हिडिओ यू-ट्यूबवर शेअर करत असते. स्वप्न सत्यात उतरायला एक क्षणही पुरेसा असतो याची प्रचितीच बहुधा तिला तेव्हा आली असावी तिच्या त्या व्हिडिओमुळे ती एका रात्रीत स्टार होते.

पतीसोबत व्हिडिओ चॅट करताना या मॉडेलने घेतला गळफास

सिनेमाचा ट्रेलर पाहूनच तो सुपरहिट ठरेल असं भाकीत आमिरने केलं आहे. तेव्हा आता त्याच्या या भाकीतामुळे ट्रेलर नेमका कसा असेल याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. हा सिनेमा ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, आता हा ‘सिक्रेट सुपरस्टार’ दिवाळीवेळी रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ सिनेमासोबत प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Secret superstar new poster dreamy zaira wasim and rockstar aamir khan are on a musical journey

ताज्या बातम्या