अभिनेत्री विद्या बालनने तिचा एक TikTok व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल यात काहीही शंका नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते असे सांगताना तिने एक विनोदी व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिने Tak-Tuk असे नाव देत कधी कधी टाइमपासही केला पाहिजे असं म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ
‘शास्त्रोके अनुसार हर कुँवारी लडकीमें नौ देवीयोंका वास होता है, लेकिन शादीके बाद कौनसी देवी अॅक्टिव्ह होगी? ये पतीके कर्मोपर निर्भर करता है’ या आवाजावर विद्या बालनने लिप सिंक केले आहेत. बातमी पूर्ण होईपर्यंत ३ लाखांच्या वर views आले आहेत. अत्यंत विनोदी पद्धतीने हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही पोट धरून हसवणारे आहेत.
विद्या बालनचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तापसी पनू, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा कसा असेल याची उत्सुकता कायम आहे. सध्या तिच्या टीकटॉक व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.