कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी चाहत्यांमुळे. बऱ्याच वेळा चाहते आपल्या आवडत्या कालाकाराला भेटेण्यासाठी प्रयत्न करत असतात. कधी कधी ते आपल्या आवडत्या कलाकारांना भेटवस्तू पाठवताना दिसतात. पण २८ वर्षीय अभिनेत्रीला एका व्यक्तीने सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे भेट म्हणून पाठवले आहे. अभिनेत्रीने पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली असून पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून एक व्यक्ती अभिनेत्रीला तिच्या घरी काही भेटवस्तू पाठवत आहे. या भेटवस्तूंमध्ये सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे आहेत. सुरुवातीला अभिनेत्रीने याकडे दुर्लक्ष केले. पण सतत अशा भेटवस्तू येऊ लागल्यामुळे अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली. अंबोली पोलीस ठाण्यात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
Narendra Modi amit shah
केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार; सूत्रांची माहिती, पोर्टलही तयार

या संदर्भात अंबोली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली की एका अज्ञात व्यक्तीवर याप्रकरणी भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर अभिनेत्रीला भेटवस्तू येणे बंद झाले आहे. तपास सुरु असताना पोलिसांना काही फोन नंबर मिळाले आहेत. या मोबाईल नंबरवरुन ऑनलाइन भेटवस्तू ऑर्डर करण्यात आल्या होत्या. पण हे मोबाईल नंबर कुणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.