“करण जोहर सर्व खातो, त्यामुळे सेटवर जेवणच…”, शूटिंगदरम्यान शबाना आझमींची तक्रार

तर दुसरीकडे करण जोहर हा त्या ठिकाणी जेवताना दिसत आहे.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्या रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. दरम्यान कोरिओग्राफर फराह खानने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

फराह खानने शनिवारी तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शबाना आझमी या चित्रपटाच्या सेटवर जेवण मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. तर दुसरीकडे करण जोहर हा त्या ठिकाणी जेवताना दिसत आहे.

यावेळी फराह खान शबाना आझमी यांना जेवणाबद्दल विचारतात त्यावेळी त्या म्हणाल्या, “करण जोहरमुळे मला जेवण मिळत नाही. करण जोहर एकटाच सर्व खातो आणि त्यामुळे मला काहीही जेवण मिळत नाही. करण जोहरच्या सेटवर जेवणच मिळत नाही,” अशी तक्रार शबाना आझमी करत आहेत.

हेही वाचा : लग्नापूर्वी शारीरिक संबंधाविषयी रेखा यांनी केलेले ‘ते’ वक्यव्य चर्चेत

तर दुसरीकडे शबाना आझमी यांची ही तक्रार ऐकल्यानतंर करण जोहरने यावर उत्तर दिले आहे. करण म्हणाला, “पण मी मात्र खातोय, त्यामुळे मी फार खूश आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा सर्वात जास्त मी आनंदी आहे,” असे त्याने म्हटले. यानंतर फराह खान त्या दोघांमध्ये मध्यस्थी करत म्हणाली, “मी बंद करतेय, आम्हाला तुझं काहीही ऐकायचं नाही,” असे सांगत ती व्हिडीओ बंद करते. दरम्यान सध्या हा संपूर्ण व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी हा व्हिडीओ पाहत फार मजेशीर कमेंट करताना दिसत आहे.

हेही वाचा : घटस्फोटानंतर समांथाने घेतली नागार्जुनची भेट, जाणून घ्या कारण

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका असल्याचे बोललं जात आहे. ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असणार आहे. याचे कथानक उत्तर भारतीय मुलगा आणि बंगाली मुलगी यांच्यातील प्रेम यावर असणार आहे. हे दोघेही दिल्लीत राहणारे आहेत. यात रणवीर सिंग हा एका उत्तर भारतीय मुलाच्या भूमिकेत तर आलिया भट्ट बंगाली मुलीच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यासोबच या चित्रपटात धर्मेंद्र आणि जया बच्चन हे रणवीर सिंगच्या कुटुंबातील सदस्य आहेत. तर शबाना आझमी या आलिया भट्टच्या कुटुंबातील सदस्य आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shabana azmi complains about food karan johar on the sets of rocky aur rani ki prem kahani nrp

Next Story
लग्नकल्लोळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी