scorecardresearch

जावेद साहेबांपासून लांब रहा; बोनी कपूरची शबाना आझमींच्या पोस्टवरील कमेंट चर्चेत

शबाना आझमी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Shabana Azmi tests Covid-19 positive, Shabana Azmi, coronavirus, Shabana Azmi news, Shabana Azmi age,Javed Akhtar, शबाना आजमी, जावेद अख्तर,

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर बोनी कपूर यांनी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शबाना आझमी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ‘आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरात आयसोलेट करुन घेतले आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांना मी विनंती करते की त्यांनी करोना चाचणी करुन घ्या’ या आशयाचे कॅप्शन फोटोसोबत त्यांनी दिले आहे.
आणखी वाचा : तेजस्वीने बिग बॉस १५ जिंकताच गौहर खान संतापली, ट्वीट करत म्हणाली…

त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी लवकर बऱ्या व्हा असे म्हटले आहे. तर बोनी कपूर यांनी ‘कृपया जावेद साहेबांपासून लांब रहा’ असा सल्ला शबाना आझमी यांना दिला आहे.

राज्यात करोनाच्या २७,९७१ नवीन रुग्णांची नोंद झाली व ६१ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ५०,१४२ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,४४,३४४ इतकी झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shabana azmi tests covid19 positive celebs react avb

ताज्या बातम्या