‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर झळकली होती. दीपिका आणि शाहरुखच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला अनेक चाहत्यांनी दाद दिली. बॉलीवूडमधल्या काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोड्यांमध्ये शाहरुख आणि दीपिकाला अनेकांची पसंती मिळते.
‘चैन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यु इयर’ या चित्रपटांतून शाहरुख – दीपिकाच्या जोडीने सिनेरसिकांची दाद मिळवली होती. आता पुन्हा हे दोघे एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत अशी चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात रंगत आहे. आनंद एल. राय यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाबद्दच्या सर्व अधिकृत चर्चा झाल्या असून दीपिका या चित्रपटाचा भाग होणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. दीपिका आणि शाहरुखची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट पूर्णत: रोमॅंटिक कथानकावर आधारित असून त्यात काही नृत्य दृश्येही असणार आहेत. सध्या तरी दीपिका तिच्या हॉलिवूडवारीमध्ये व्यस्त असून ती सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ट्युबलाइट’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये दीपिका झळकणार असल्याची सध्या चर्चा आहे. तर शाहरुख खानच्या ‘रईस’ आणि गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहीली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan and deepika padukone to reunite again
First published on: 03-08-2016 at 17:38 IST