करोडो चाहत्यांचा आवडता अभिनेता आणि बॉलीवूडचा बादशाहा शाहरुखने ट्विटवर साठ लाख फोलोअर्सचा टप्पा गाठला आहे. “साठ लाख फोलोअर्ससाठी धन्यवाद. या आकड्यापेक्षाही आपले प्रेम वाढत जावो. गणना होणार नाही आणि मोजताही येणार नाही इतका तुम्हाला आनंद मिळो,” या शब्दांमध्ये चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेल्या शाहरुखने ट्विट केले आहे.
SRK6Million,#6MillionSRKiansOnTwitterआणि #6millionssrkians हे तीन टॅग ट्विटरवर असून, शाहरुखच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याचे चाहते यांचा वापर करू शकतात. शाहरुखने आमिर आणि सलमान या दोन्ही खान अभिनेत्यांना ट्विटरवर मागे टाकले आहे. यांच्या चाहत्यांची संख्याही लवकरच ५० लाखांवर होईल.
२३ नोव्हेंबरला अमिताभ यांच्या ट्विटर चाहत्यांची संख्या ७० लाखांहून अधिक झाली. त्यावेळी त्यांनी सलमान, आमिर आणि शाहरुख हेदेखील ७० लाखांहून अधिक चाहते असण्याचे पात्र आहेत, असे ट्विट केले होते. बीग बींची ही इच्छा पूर्ण होत आहे असे वाटते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2013 रोजी प्रकाशित
शाहरुखने गाठला ६० लाखांचा टप्पा!
करोडो चाहत्यांचा आवडता अभिनेता आणि बॉलीवूडचा बादशाहा शाहरुखने ट्विटवर साठ लाख फोलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

First published on: 03-12-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan crosses 6 million followers on twitter