शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. जर ती मित्र-मैत्रिंणींसोबत बाहेर फिरायला जरी गेली, तरी तिच्या भोवती प्रसारमाध्यमांचा गराडा असतो. कुटुंबासोबत फिरतानाचे फोटो असो किंवा बिकीनीमधील तिचे प्रत्येक फोटो हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. यादरम्यान सुहानाचा अजून एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये सुहाना एका स्विमिंग पुलमध्ये उभी असलेली दिसते. कॅमेऱ्याने कैद केलेली तिची नजर ही घायाळ करणारी आहे. वडिलांप्रमाणे आता तिलाही कॅमेऱ्याकडे कसे पाहायचे हे कळायला लागले आहे. त्यामुळेच एका सुपरस्टारची मुलगी कशी असते याचे जर उदाहरण द्यायचे झाले तर सुहानाचे नक्कीच देता येईल. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात होते.

सुहाना प्रसारमाध्यमांसमोर नेहमीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आली आहे. ती शाहरुख, गौरीसोबत जरी दिसली तरी आता प्रसारमाध्यमांचे लक्ष हे इतरांपेक्षा तिच्यावरच अधिक असते. सध्या सुहाना तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना आणि आर्यनच्या भविष्याबद्दल शाहरुखने अनेकदा सांगितले की, भविष्यात मुलांना जे करायचे आहे ते करु शकतात पण त्याआधी प्रत्येकाकडे पदवीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे. ही त्याची अट आहे.