बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान २०१७ मध्ये ‘रईस’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. यावेळी प्रमोशनसाठी शाहरुख वडोदरा रेल्वे स्टेशनवर होता. त्यावेळी शाहरुख विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता गुजरात उच्च न्यायालयाने हा गुन्हा फेटाळला आहे. त्यावेळी

प्रमोशन दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. या संपूर्ण प्रकरणात गुजरात हायकोर्टाने शाहरुख खानवर दाखल करण्यात आलेला गुन्हा फेटाळून लावला आहे.न्यायमूर्ती निखिल एस करील यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. संबंधित घटनेला शाहरुख खान किंवा त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत होता असं म्हणता येणार नाही.

आणखी वाचा : “अमृताला खडूस नेत्रकटाक्ष…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

२०१७ मध्ये झालेल्या त्या घटनेनंतर काँग्रेस नेते जितेंद्र सोलंकी यांनी शाहरुख विरोधात तक्रार दाखल केली होती. या समन्सविरोधातील तक्रार फेटाळण्यासाठी शाहरुख खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.