बॉलिवूडच्या जगतामध्ये कमाईतच नव्हे, तर अभिनयामध्ये ही श्रीमंत असणारा शाहरुख खानने आजही स्वप्ने पाहणे बंद केलेले नाही. स्वप्ने पाहणारा आणि ती सत्यात उतरविणारे व्यक्तिमत्व म्हणून शाहरुखकडे पाहिले जाते. सर्कसमध्ये काम करुन बॉलिवूडचा बादशहा बनल्याचा त्याचा प्रवास स्वप्नवत असचा होता. अभिनेता बनण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले असले तरी  या बॉलिवूड बादशहाचे  आणखी एक स्वप्न आहे. बऱ्याच लोकांना त्याचे हे स्वप्न माहित देखील नसेल. शाहरुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या स्वप्नाविषयी सांगितले.

शाहरुख  स्वत:चे रेस्तरॉ उघडण्याचे स्वप्न मनी बाळगून आहे. आता तुम्ही म्हणाल हे स्वप्न तर त्याच्यासाठी सहज शक्य होणारे असेच आहे. पण शाहरुखचे स्वप्न रेस्तोरॉ सुरु केल्यानंतर सुरु होणारे असल्याचे दिसते. इटालियन पद्धतीच्या खाद्यपदार्थांची मेजवाणी असणाऱ्या या रेस्तरॉमध्ये शाहरुखला खुद्द शेफ बनून लोकांना भरविण्याची इच्छा आहे. शाहरुखने स्वत:ची तुलना बॉक्सर जॅक लामोटाशी (Jake LaMotta ) करत त्याच्यासारखे शेफ बनण्याची स्वप्न पाहत असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले. लठ्ठ झाल्यानंतर जुहू परिसरात रेस्तरॉ उघडून लोकांना इटालियन मेजवाणी देईल, असे तो म्हणाला.

सुपरस्टार शाहरुख खानला तर सर्वचजण ओळखतात. त्याचे चित्रपट बॉलीवूडमध्ये १०० कोटी क्लबमध्ये असतात, त्याने आयपीएलचा संघ विकत घेतलेला आहे आणि तो बहुतेक जाहिरातींमध्येही झळकत असतो. त्यामुळे त्याचे चाहतेही असंख्य आहेत यात काहीच शंका नाही. पण, एक वेळ अशी होती की, फक्त टेलिव्हिजन बघणा-यांनाच शाहरुख खान हे नाव माहित होते. दूरदर्शनवर १९८० नंतरच्या काही मालिकांमध्ये शाहरुख झळकला होता. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘सर्कस’. त्यावेळी त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पणही केले नव्हते. दरम्यान, शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सर्कस’ आणि ‘फौजी’ या दोन मालिकांमुळे शाहरुख प्रसिद्धीच्या झोतात आला होता. दूरदर्शनवर १९८९ साली दाखविण्यात आलेली ‘सर्कस’ ही मालिका आता पुन्हा दाखविण्यात येणार आहे.

त्याच्या लोकप्रियतेचा अनुभव देखील नुकताच आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या अभिनेता शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आला होता. शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. याचाच संदर्भ घेत जागतिक स्तरावर ओळखले जाणारे लेखक पावलो कोएलो यांनी एक ट्विट केले होते. ‘हॉलिवूडमध्ये निष्पक्ष व्यवहार असता तर शाहरुख खानला त्याच्या माय नेम इज खान या चित्रपटासाठी शाहरुख खानला ऑस्कर परस्कार मिळायला हवा होता’, असे मत पावलो यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे.