बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरूख खानने नुकतेच बॉलिवूडमध्ये २५ वर्ष पूर्ण केले आहेत. त्यामुळे यावर्षीचा ईदसुद्धा शाहरूखसाठी विशेष होता. दरवर्षीप्रमाणे ईदच्या निमित्ताने शाहरूख आपल्या चाहत्यांना ‘मन्नत’ बंगल्याबाहेर भेटला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुलांसोबत वेळ घालवण्यापासून ते आगामी चित्रपट, वैयक्तिक आयुष्य या सर्व गोष्टींबाबत शाहरूख मनमोकळेपणाने बोलला.

शाहरूख व्यस्त कामकाजातून तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला वेळ देण्याला नेहमीच प्राध्यान्य देतो. त्यांच्या शिक्षणाविषयी, करिअरविषयी तो नेहमीच जागरूक असतो. मुलगा आर्यन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा असतानाचा मुलगी सुहानासुद्धा अभिनय क्षेत्रात येणार असल्याचे बोलले जात आहे. आर्यन सध्या परदेशात अभिनय क्षेत्रात पदवी घेत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वी मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करावे असा शाहरूखचा आग्रह आहे.

वाचा : ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील ‘थंगबली’ची मुंबईतील रेस्तराँ मालकालाही पडली भुरळ

मुलांच्या शिक्षणाविषयी बोलताना शाहरूख म्हणाला की, ‘माझ्या मुलांनी आधी आपले शिक्षण पूर्ण करावे. माझ्या घरी प्रत्येकाने कमीत कमी पदवीधर तरी असावे अन्यथा पदवीधर नसल्यांना माझ्या घरात येण्याची परवानगी नाही. सुहाना सध्या अकरावीत आहे. त्यामुळे तिचे शिक्षण पूर्ण होण्यास अजून पाच वर्ष आहेत. आर्यनलाही पदवीधर होण्यास पाच वर्ष बाकी आहेत. सुहानाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यानंतर तिला अभिनयाचे शिक्षण घ्यावे लागणार. त्यामुळे अजून बराच वेळ आहे. सेलिब्रिटींसोबत सार्वजनिक ठिकाणी जाणं म्हणजे तुम्हाला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे असा अर्थ होत नाही. बहुधा असं असेलही. पण, मुलं ही काही कोणी स्टार नाहीत. ती फक्त आम्हा कलाकारांची मुलं आहेत.’

VIDEO: ‘चीज बडी है मस्त मस्त’चं हे व्हर्जन ऐकलं का?

२५ वर्ष अभिनय क्षेत्रात पूर्ण केलेल्या किंग खान शाहरूखला शिक्षणाची विशेष आवड आहे. म्हणूनच आपल्या मुलांनीही पूर्ण शिक्षण घेतल्यानंतरच आवडत्या करिअरची निवड करावी असे त्याला वाटते.