यावर्षी अबरामला काय ईदी मिळणार असा प्रश्न विचारला असता शाहरूख म्हणाला की, ‘अबरामसाठी प्रत्येक दिवस हा ईद असतो. मात्र आज त्याच्यासाठी मी एखादा पदार्थ बनवण्याचा विचार केला आहे.’ प्रत्येक सणाला कुटुंबाला वेळ देण्याला शाहरूख नेहमीच प्राधान्य देतो. याविषयी तो पुढे म्हणाला की, ‘ईद असो किंवा दिवाळी, जेव्हा आम्ही सर्व एकत्र असतो तेव्हा तो क्षण मला खूप आवडतो. आम्ही सगळे घरी एकत्र प्रार्थना करतो, माझी मुलंसुद्धा सणानुसार नवीन कपडे घालतात.’
VIDEO : मित्राच्या लग्नात रणवीर-दीपिकाचा अफलातून डान्स
सिनेसृष्टीत २५ वर्ष पूर्ण केलेल्या शाहरूखसाठी ही ईद विशेष आहे. ‘मला परवा कळालं की बॉलिवूडमध्ये मला २५ वर्ष पूर्ण झाली. याचं नेमकं गणित मला माहित नाही पण मला असं वाटतं की मी २६-२७ वर्ष सिनेसृष्टीत पूर्ण केली. माझं अर्ध आयुष्य यामध्ये गेल्याने हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यामुळे ही ईद माझ्यासाठी खूपच विशेष आहे,’ असं यावेळी शाहरूख म्हणाला.
वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…
२५ वर्षांत चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी शाहरूखने मनापासून चाहत्यांचे आभार मानले. शाहरूख आणि अनुष्का शर्माचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.