तामिळ चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कोचादैयान’ या बहुचर्चित चित्रपटाच्या नऊ मार्च रोजी होणा-या संगीत अनावरण सोहळ्याला बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान हजेरी लावणार आहे. रजनीकांत यांची कन्या आणि कोचादैयान चित्रपटाची दिग्दर्शिका सौदर्या आर. अश्विन हिने शाहरूख खानला या सोहळ्याला हजर राहण्यासाठी जातीने निमंत्रण दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. ‘मोशन कॅप्चर फोटो रिअलस्टिक’ या तंत्रावर आधारित असलेला ‘कोचादौयान’ हा भारतातील पहिलाच चित्रपट असून येत्या ११ एप्रिल रोजी हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण , जॅकी श्रॉफ, शरथ कुमार यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.