शाहरुख खानच्या लेकीचं नवं टॅलेंट; सुहाना खानचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत सुहानाला अवगत असलेली एक नवी कला समोर आलीय.

suhana-khan-
(File Photo-Suhana Khan)

अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. कुंटुंबापासून दूर असली तरी सुहाना आपल्या कुटुंबाला कायमच मिस करताना दिसते. नुकताच सुहाना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुहानाला अवगत असलेली एक नवी कला समोर आलीय.

या व्हिडीओत सुहाना खानने गौरी खानसाठी म्हणजेच तिच्या आईसाठी एक खास चित्र रेखाटलं आहे. यातून सुहाननाने तिचं नवं टॅलेंट चाहत्यांना दाखवलंय. सुहान खानने शेअर केलेल्या व्हिडीओत ती एका स्त्रीचं चित्र रेखाटताना दिसतेय. चित्र रेखाटून झाल्यावर यावर तिने ‘मॉम’ असं लिहिलंय. सुहाना खानने रेखाटलेलं हे चित्र चालकोल म्हणजे कोळशापासून रेखाटलेलं चित्र आहे. यात तिने काही रंग भरले आहेत.

shuhana-khan
(Photo-Instagram-Suhana Khan)

 

हे देखील वाचा: श्रद्धा कपूरचं चॅट व्हायरल; फोटोग्राफर्सवर चाहते भडकले
तर लाडक्या लेकीने काढलेलं हे चित्र गौरी खानने देखील तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केलंय. व्हिडीओ शेअर करत गौरी खानने एक कॅप्शन देखील दिलंय. यात ती म्हणाली, “चालकोल कला,कोरड्या कलेचा एक प्रकार, अत्यंत उपचारात्मक” असं म्हणत गौरीने सुहानाला देखील टॅग केलंय.

सोशल मीडियावर सुहाना खानने रेखाटलेल्या चित्राचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. सुहानाच्या चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दिलीय. सुहाना खान सोशल मीडियावर सक्रिय असून मित्र मैत्रिणींसोबतचे आणि स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अनेकदा सुहाना तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shaharukh khan daughter suhana khan charcoal drawing of mother gauri khan video goes viral kpw