बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मीराशी लग्न करण्याआधी शाहिद अभिनेत्री करीनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्या दोघांची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते विभक्त झाले.

रिपोर्ट्स नुसार करीनाची इच्छा होती की तिच्या प्रत्येक चित्रपटात शाहिद तिच्यासोबत असला पाहिजे. एवढचं काय तर करीना निर्मात्यांसमोर अशी मागणी करायची. करीनाची ही गोष्ट तिची आई बबिता आणि करिश्माला आवडतं नव्हती.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिदा’ या चित्रपटादरम्यान, त्या दोघांमध्ये दुरावा आला. दरम्यान, अस म्हटलं जातं की शाहिदला जेव्हा किस्मत कनेक्शनसाठी साइन केले जाते आणि करीनाला टशन चित्रपटासाठी. तेव्हा दोघांमध्ये दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तीरेखा; श्रेयस तळपदने केला खुलासा

‘टशन’ या चित्रपटादरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खान जवळ आले होते. एवढचं काय तर करीनाला सैफ आवडू लागला होता. त्याचवेळी शाहिद कपूरचे नाव विद्या बालनशी जोडले जात होते. याच दरम्यान, करीना आणि शाहिदमध्ये भांडण होऊ लागली होती. याशिवाय त्यादोघांच्या भांडणात करीनाची आई बबिता सुद्धा दखल घ्यायच्या. त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : ‘त्या’ दृश्यांवरून अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

दरम्यान, २००७ मध्ये करीना आणि सैफ रिलेशनशिपमध्ये आले. हे दोघं जवळपास ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये शाहिदने मीराशी लग्न केले. यानंतर ते दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले.