अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनच्या आठव्या भागात दिसणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. प्रोमो खूपच मजेदार असून करण शाहिद आणि कियाराशी अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसत आहे. करणने दोघांना वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. तसेच त्यांच्या चित्रपट आणि आगामी प्रोजेक्टबद्दलही विचारलं. शाहिद आणि कियाराने करणच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

या शोमध्ये शाहिदने त्याच्या आणि मीराच्या भांडणाचं कारण सांगितलं. त्या दोघांमध्ये रात्रभर कोणत्या कारणावरून भांडत होतं याबद्दल शाहिदने खुलासा केला. शोच्या रॅपिड-फायर राउंड दरम्यान शाहिद म्हणाला, “मी आणि मीरा दररोज रात्री पंख्याच्या स्पीडवरून भांडतो. आमच्यात असे शुल्लक मतभेद असूनही मीरा माझ्या जीवनाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. मीरा ही माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. ती माझ्या आयुष्यात खूप काही घेऊन आली आहे. ती मला पूर्ण करते. आम्हाला दोन सुंदर मुलं आहेत आणि आयुष्य छान वाटतंय,” असंही शाहिद म्हणाला.

दरम्यान, करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट-रणवीर सिंह, जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आमिर खान-करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.