माझ्या शाहिदचा ‘शानदार’ सुपरहिट ठरेल- मीरा

शाहिद कपूरचा आगामी शानदार चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास तिची पत्नी मीरा राजपूतने व्यक्त केला आहे.

शाहिदच्या आगामी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग पाहिल्यानंतर त्याच्या पत्नी मीराने चित्रपटाचे 'शानदार' कौतुक केले.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी शानदार चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास तिची पत्नी मीरा राजपूतने व्यक्त केला आहे. शाहिदच्या आगामी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग पाहिल्यानंतर त्याची पत्नी मीरा राजपूत हिने चित्रपटाचे ‘शानदार’ कौतुक केले. शाहिदचा शानदार चित्रपट त्याच्या आजवरच्या चित्रपटांपैकी सुपरहिट चित्रपट ठरेल, असे मीराने सांगितले. तसेच चित्रपटात शाहिदच्या लूकने आपल्याला भुरळ घातल्याचेही ती म्हणाली.
शानदार चित्रपट हा चित्रिकरणापासूनच बराच चर्चेत राहिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱया या चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shahid kapoors wife mira rajput feels shaandaar will be her husbands biggest hit