शाहरुखच्या मुलाचं पदार्पण, ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी देणार आवाज

‘द लायन किंग’ चित्रपटातील ‘मुफसा’साठी शाहरुखने तर ‘सिम्बा’साठी आर्यनने आवाज दिला आहे.

shah rukh khan with son
शाहरुख खान, आर्यन खान

बॉलिवूड कलाकार कायमच हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी रीमेकला व्हॉइसओव्हर देत असतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘मेन इन ब्लॅक’. या चित्रपटासाठी सिद्धांत चतुर्वेदी व सान्या मल्होत्रा या कलाकारांनी आवाज दिला आहे. याच ट्रेंडला धरून बॉलिवूड किंग शाहरुख खान व त्याचा मुलगा आर्यन खान यांनीदेखील एका सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाला आवाज दिला आहे. ‘द लायन किंग’ चित्रपटातील ‘मुफसा- सिम्बा’ या वडील मुलाच्या जोडीला त्यांनी आवाज दिला आहे.

हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला की, “या चित्रपटाच्या डबिंगसाठी मी आर्यनसोबत काम केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” असंही त्याने सांगितलं. “मुलासोबत काम करणं हा माझ्यासाठी भावनिक अनुभव होता. त्यातही आम्ही ‘मुफसा- सिम्बा’ या वडील मुलाच्या जोडीलाच आवाज दिला आहे. त्यामुळे हे डबिंग जास्त खास आहे. माझा सगळ्यात धाकटा मुलगा अबराम हा ‘लायन किंग’चा फॅन आहे. आमचे आवाज या चित्रपटात ऐकून त्याला खूप आनंद होईल.”

कालच शाहरुखने आर्यनसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघंही जर्सी परिधान करून बसले आहेत. शाहरुखच्या जर्सीवर ‘मुफसा’ तर आर्यनच्या जर्सीवर ‘सिम्बा’ हे नाव पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सुद्धा ट्विटकरून याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे.

हा चित्रपट १९ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shahrukh khan aaryan khan imba mufsa voiceover djj

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या