scorecardresearch

मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

शाहरुख खानने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

shahrukh khan, mannat,
शाहरुख खानने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखचे लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. असे अनेक चाहते असतात जे त्यांच्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करायला तयार असतात. शाहरुखचा असाच एक चाहता, जो शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये दाखल झाला होता या विषयी स्वत: शाहरुखने सांगितले आहे.

शाहरुखने एका मुलाखतीत या विषयी सांगितले होते. एक व्यक्ती त्याचा इतका मोठा चाहता होता की सुरक्षारक्षकाची नजर चुकवून तो ‘मन्नत’मध्ये शिरला होता. पण घरात गेल्यावर शाहरुखला भेटण्याच्या जागी तो स्विमिंग पूलजवळ गेला. त्याने त्याचे कपडे उतरवायला सुरुवात केली आणि पूलमध्ये गेला. जेव्हा शाहरुख त्याला भेटायला आला तर त्या चाहत्याने सेल्फी किंवा ऑटोग्राफ घेतला नाही. तो म्हणाला, मला काहीच नको. मला फक्त या पूलमध्ये अंघोळ करायची आहे, ज्या पूलमध्ये शाहरुख अंघोळ करतो.

आणखी वाचा : ‘पुष्पा’मुळे लागला जॅकपॉट; समांथाला मिळाली बॉलिवूडमधल्या ३ चित्रपटांची ऑफर

दरम्यान, शाहरुख लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. शाहरुख सगळ्यात शेवटी झीरो या चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. शाहरुखच्या या आगामी चित्रपटाचे नाव पठान आहे. या व्यतिरिक्त शाहरुख आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख सान्या मल्होत्रा आणि नयनतारा या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख या व्यतिरिक्त सलमान खानच्या टायगर ३ या चित्रपटात स्पेशल अपीयरंस देणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2022 at 12:00 IST

संबंधित बातम्या