बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आता नव्याने रुपेरी पडद्यावर कमबॅक करतोय. त्याचे दोन बिग बजेट हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सध्या त्याच्या चित्रपटांच्या कामामध्ये तो व्यस्त आहेच. पण त्याचबरोबरीने सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शाहरुखने त्याच्या राहत्या घरी एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.

शाहरुखने मन्नतमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये परदेशातील काही दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा तसेच इतर देशांमधील राजदूत उपस्थित होते. या पार्टीदरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये शाहरुख परदेशातील पाहुण्यांचा पाहुणचार करताना दिसत आहे. तसेच त्यांच्याबरोबर फोटो देखील काढत आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

आणखी वाचा – Photos : साऊथच्या चित्रपटांना टक्कर देणार बॉलिवूडचे ‘हे’ ५ चित्रपट, बॉक्स ऑफिसवर कमावणार कोट्यावधी रूपये

फ्रान्सचे भारतीय राजदूत Mr. Jean-Marc Séré-Charlet यांनी मन्नतवर झालेल्या पार्टीनंतर एक ट्विट करत शाहरुखचं कौतुक केलं आहे. “फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शाहरुख खानला देणं अगदी योग्य आहे. शाहरुख तू दिलेल्या पार्टीबद्दल तुझे मनापासून आभार.” अशाप्रकारचं ट्विट फ्रान्सचे भारतीय राजदूत यांनी केलं आहे. तसेच त्यांनी शाहरुखसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.

आणखी वाचा – कतरिनाने पतीसोबत शेअर केला स्विमिंगपूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज

फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या शाहरुखने दिलेल्या योगदानासाठी त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आलं. कॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी देखील ट्विट करत शाहरुखचं तोंड भरून कौतुक केलं.