scorecardresearch

दिवसाला १०० सिगारेट आणि ३० कप ब्लॅक कॉफी शाहरुखने केला होता त्याच्या व्यसनाबद्दल खुलासा

शाहरुखने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

shahrukh khan, shahrukh khan lifestyle,
शाहरुखने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखने बॉलिवूडमध्ये स्वत: चे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. शाहरुख कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुखने एक आलिशान आयुष्य जगतो असे प्रत्येकाला वाटते. पण लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा शाहरुख अशी जीवनशैली जगतो की ज्याबद्दल जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

शाहरुखला धूम्रपानचे व्यसन आहे हे त्याने उघडपणे सांगितले होते. २०११ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, शाहरुखने स्वत:ची ही वाईट सवय सांगितली आणि खुलासा केला की दिवसाला तो १०० सिगारेट पीतो आणि सुमारे ३० कप ब्लॅक कॉफी पितो. त्याच मुलाखतीत त्याने त्याच्या खाण्यावरच्या प्रेमाविषयीही सांगितलं. यावेळी शाहरुख म्हणाला, त्याच्या वडिलांचे दिल्लीत रेस्टॉरंट होते आणि तिथली स्पेशॅलिटी ही पठाणी जेवण होते. तर त्याची आई हैद्राबादी जेवण चविष्ठ बनवायची. तर जोपर्यंत त्याची आई जिवंत होती तोपर्यंत ती शाहरुखला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची.

आणखी वाचा : करीना कपूरला बॉडी शेम केल्याने पाकिस्तानी अभिनेत्री सोशल मीडियावर झाली ट्रोल

आणखी वाचा : “लग्न झालं आहे तरी…”, रोहित शेट्टीने विराजसला दिला हा खास सल्ला

शाहरुख १०० सिगारेट पीतो

याच मुलाखतीत शाहरुखने आपल्या आहाराबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले की मला झोप येत नाही. मी सुमारे १०० सिगारेट पीतो. कधी कधी मी जेवायचं विसरतो. मला शूटिंगच्या दरम्यान आठवतं की मलाही जेवायला हवं. मी पाणी पीत नाही. मी एकंदर तीस कप ब्लॅक कॉफी पितो आणि माझ्याकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. त्यामुळे मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो तितकीच माझी आपोआप काळजी घेतली जाते.

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?

शाहरुख खान सगळ्यात शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस यशस्वी होऊ शकला नाही. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahrukh khan lifestyle revealed i smoke about 100 cigarettes have 30 cups of black coffee dcp

ताज्या बातम्या