शाहरुख खानने चक्क आलिया भट्टकडे मागितलं काम; रिट्विट करत म्हणाला, वचन देतो…

आलिया सध्या ‘डार्लिंग्स’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

shahrukh khan request alia bhatt to sign him for her next production
आलिया सध्या 'डार्लिंग्स'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिचा आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने आलियाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि शाहरुखने तिच्याकडे काम मागितले आहे.

आलियाने ट्विटरवर व्हॅनिटी व्हॅनमधील एक फोटो शेअर केला. आलियाचे ट्वीट रिट्वीट करत “या चित्रपटाच्या निर्मितीनंतर कृपया मला तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी साइन कर. चित्रीकरणासाठी मी वेळेत येईन आणि नीट काम करेन..असे वचन देतो”, अशा आशायचे ट्वीट शाहरुखने केले आहे. तर शाहरुखला उत्तर देत “मी याहून जास्त काही मागू शकत नाही..तर ठरलं मग तुला साइन केलं! माझी सगळ्यात आवडती व्यक्ती”, अशा आशयाचे ट्वीट आलियाने केले.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

आणखी वाचा : सीतेच्या भूमिकेसाठी मानधनाची रक्कम वाढवलेल्या करीनाची पाठराखण करत तापसी म्हणाली…

दरम्या, ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मैथ्यू आणि शेफाली शाह दिसणार आहेत. आई आणि मुलीच्या कथेवर आधारित हा चित्रपट मुंबईच्या पुराणमतवादी मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी दाखवण्यात येणार आहे, यात त्या दोघीही आपल्या प्रेमाला शोधतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shahrukh khan request alia bhatt to sign him for her next production dcp

ताज्या बातम्या