VIDEO : “मन्नतमध्ये ११ ते १२ टिव्ही अन् त्याची किंमत…”, शाहरुखचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले हैराण

अभिनेता शाहरुख खानचे महागडे कपडे, महागड्या गाड्या याची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगताना दिसते. शाहरुख त्याच्या महागड्या लाइफस्टाइलमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

shah rukh khan, shah rukh khan house
अभिनेता शाहरुख खानचे महागडे कपडे, महागड्या गाड्या याची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगताना दिसते. शाहरुख त्याच्या महागड्या लाइफस्टाइलमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. आज तो कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. वांद्रे येथे तो राहत असलेल्या मन्नत या बंगल्याची किंमत देखील कोट्यावधींच्या घरात आहे. शाहरुखचं लाइफस्टाइल तर नेहमीच चर्चेत असतं. त्याचे महागडे कपडे, किंमती गाड्या पाहून सगळेच अवाक् होतात. आता तर शाहरुखने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. त्याच्या घरात तब्बल एक नव्हे तर ११ ते १२ टिव्ही आहेत.

शाहरुखने दिल्ली येथे एका ब्रँडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथे त्याने त्याच्या राहत्या घरात किती टीव्ही आहेत? या टीव्हीची किंमत काय? याबाबत सांगितले आहे. शाहरुख या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, “माझ्या तसेच माझ्या तीनही मुलांच्या बेडरुमध्ये, लिव्हींग रुममध्ये प्रत्येक रुममध्ये एक-एक टीव्ही आहे.”

आणखी वाचा – हद्दच झाली राव! करोडो रुपयांची कार अन् तीन वेळा अपघात, कंगना रणौत म्हणते…

शाहरुख पुढे बोलताना म्हणाला, “माझ्या घरी एकूण ११ ते १२ टीव्ही आहेत. प्रत्येत टीव्हीची किंमत ही एक ते दीड लाख रुपयांच्या घरात आहे.” म्हणजेच या शाहरुखच्या राहत्या बंगल्यामध्ये असणाऱ्या सगळ्या टीव्हींची एकूण किंमत ३० ते ४० लाख रुपयांपर्यंत आहे. शाहरुख या कार्यक्रमामध्ये मन्नतमधील टीव्हीबद्दल सांगतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Photos : टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नीचा बोल्ड अंदाज, टॉपच्या अभिनेत्रीही पडतील फिक्या

त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली. “एवढ्या पैश्यांमध्ये तर आम्ही एक घर घेऊ”, “आता मला गरिब असल्यासारखं वाटत आहे”, “म्हणूनच शाहरुख किंग आहे” अशा अनेक कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत. शाहरुखच्या घराचं इंटेरियर देखील पाहण्यासारखं आहे. एकूणच काय तर बॉलिवूडच्या किंगची लाइफस्टाइल पाहून अनेकांच्या भूवया उंचावतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahrukh khan tvs worth rs 30 40 lakh in mannat actor video viral on social media kmd

Next Story
“माझ्या नावाच्या मध्यभागी महेश कोठारे हे नाव असल्यामुळे…”, आदिनाथ कोठारेचा खुलासा
फोटो गॅलरी