scorecardresearch

‘ब्रह्मास्त्र २’मध्ये शाहरुख साकारणार ‘देव’? शर्टलेस फोटोनंतर नवा वाद; आपापसात भिडले रणवीर- हृतिकचे चाहते

मागच्या काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’ची वेगवेगळ्या कारणांनी चर्चा आहे.

‘ब्रह्मास्त्र २’मध्ये शाहरुख साकारणार ‘देव’? शर्टलेस फोटोनंतर नवा वाद; आपापसात भिडले रणवीर- हृतिकचे चाहते
नुकताच शाहरुख खानने स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे, जो पाहून लोक आता गोंधळले आहेत.

अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान पाहुणया कलाकाराच्या भूमिकेत दिसला. याशिवाय रणबीर अर्थात शिवाचे आई-वडील म्हणून अमृता आणि देव यांची हलकीशी झलक दिसून आली. ‘ब्रह्मास्त्र : पार्ट 2- देव’ ही कथा असेल असं बोललं जात आहे. रणवीर सिंग देवच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा आहे. रणवीर व्यतिरिक्त हृतिक रोशनचेही नाव देवच्या भूमिकेसाठी पुढे येत होते, पण नुकताच शाहरुख खानने स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे, जो पाहून लोक आता गोंधळले आहेत.

शाहरुख खानने एक दिवसापूर्वी सोशल मीडियावर स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. यामध्ये तो त्याचा सिक्स पॅक फ्लॉन्ट करताना दिसत आहे. लांब केसांमधील शाहरुखचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले. हातात भरपूर ब्रेसलेट्स, अंगठ्या आणि टॅटू आहेत. शाहरुखचा हा फोटो पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी असा दावा करण्यास सुरुवात केली की, ‘ब्रह्मास्त्र २’ मधील देवची भूमिका रणवीर सिंग किंवा हृतिक रोशन नाही तर खुद्द शाहरुख खान करणार आहे.

आणखी वाचा- नेहा कक्कर- फाल्गुनी पाठक वादात सोना मोहपात्राची उडी, केली रिमिक्स गाण्यांवर कारवाईची मागणी

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खानने वैज्ञानिक मोहन भार्गवची भूमिका साकारली होती आणि यासह तो वानरास्त्रही होता. शाहरुख खानच देव असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर एका युजरने लिहिलं, “नाही, असं असतं तर त्याला मारलं गेलं नसतं.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “जर तो देव असता तर जुनूनकडून त्याने ब्रह्मास्त्रचा तुकडा का घेतला असता. तो स्वतः जाऊन प्रत्येकाकडून घेऊ शकली नसती का?” याशिवाय ही भूमिका हृतिक साकारणार की रणवीर यावरूनही सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये वाद सुरू आहेत.

आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागात ‘जुनून’ हे पात्र दिसणार का? अभिनेत्री मौनी रॉयने केला खुलासा

आता ‘ब्रह्मास्त्र’मध्ये देवाची भूमिका कोण साकारणार? काय आहे रणबीर कपूरचे वडील देव यांची कहाणी? देवसाठी ‘ब्रह्मास्त्र’ का आवश्यक आहे? देव आणि अमृता का वेगळे झाले? दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार की आणखी कोणी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘ब्रह्मास्त्र २’ मध्येच पाहायला मिळणार आहेत. अयान मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाचा दुसरा भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या