शमा सिकंदरचं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर बोल्ड फोटोंची चर्चा

या फोटोमधला शमा सिकंदरचा बोल्ड आणि मादक लूक पाहून फॅन्स पुरते घायाळ झाले आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

shama-sikander-goes-nude-for-bold-photoshoot

एका सोज्वळ सूनेच्या भूमिकेतून टीव्हीवरून डेब्यू करणारी अभिनेत्री शमा सिकंदर सध्या तिच्या बोल्डनेसने कायम चर्चेत येत असते. तिच्या बोल्ड लूकने ती बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना सुद्धा तगडी टक्कर देतेय. तिच्या बोल्डनेसला आणखी तडका देत तिने नुकतंच न्यूड फोटोशूट केलंय. यात ती एका हॅटने स्वतःचं शरीर झाकताना दिसून आली. तसंच या फोटोमधला तिचा खुपच बोल्ड आणि मादक लूक पाहून फॅन्स पुरते घायाळ झाले आहेत.

आपल्या हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत आलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट बरीच सक्रिय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक न्यूड फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये ती सफेद रिम्स असलेल्या मोठ्या आकाराच्या खिडकीला पाठ करून उभी आहे. यात तिने हातात काळ्या रंगाची हॅट पकडून शरीर झाकलंय. तिच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी तिने केसांना पुढे घेत पोज देताना दिसून येतेय. शमाने या फोटोला शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिलं आहे. ‘हॅट ट्रीक’ असं लिहित तिने आपला बोल्ड लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमा सिकंदरने शेअर केलेल्या या फोटोमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यापूर्वी सुद्धा तिने असा न्यूड फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केला होता. एखाद्या आगीप्रमाणे तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिच्या या फोटोवर आतापर्यंत ४५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसंच तिच्या या फोटोवर फॅन्स देखील कमेंट्सचा पाऊस पाडत तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. ‘हॅट सोबत काय ट्रीक केलीय’ अशी कमेंट्स काही युजर्स करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : अभिनेत्री नुसरत जहाँ रूग्णालयात दाखल; आज देणार ‘गुड न्यूज’

अभिनेत्री शमा सिकंदरचं नाव बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत पाहिलं जातं. ‘ये मेरी लाईफ है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शमा सिकंदरने नंतर स्वतःमध्ये कायापटल केला. तिनं आतापर्यंत सीआयडी, जोडी कमाल की, एक खिलाडी एक हसीना, माया यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सेक्सोहॉलिक या शॉर्ट फिल्ममध्ये तिनं एका सेक्स एडिक्टेट महिलेची भूमिका साकारली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shama sikander goes nude for bold photoshoot bold photos viral prp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या