रणबीर कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शमशेरा’कडून प्रेक्षकांना तसेच चित्रपटसृष्टीलाही बऱ्याच अपेक्षा होत्या. पण २२ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट अवघ्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. आता ज्याप्रकारे चित्रपटाची संथ कमाई सुरू आहे ती पाहता हा चित्रपट १०० कोटींचा आकडा देखील पार करू शकणार नाही अशी चर्चा आहे. चित्रपटाच्या अपयशावर शमशेराचे दिग्दर्शक करण मल्होत्रा यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

करण मल्होत्राने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ‘शमशेरा’चं अपयश आणि संथ गतीने सुरू असलेल्या कमाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शमशेरा माझी आहे.’ असं म्हणत त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे. करण मल्होत्राने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझ्या प्रिय शमशेरा तू जबरदस्त आहेस. या व्यासपीठावर व्यक्त होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण इथेच मला प्रेम, द्वेष, सेलिब्रेशन आणि अपमान या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुला एकटं सोडल्याबद्दल मी तुझी पुन्हा पुन्हा माफी मागतो कारण मला तो द्वेष आणि राग सहन होत नव्हता. तो तिरस्कार पचवणं कठीण गेलं’

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

करणने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “अशाप्रकारे दूर राहाणं ही माझी कमजोरी होती आणि त्यासाठी कोणतंच कारण नाही. पण आता मी इथे आहे, तुझ्यासोबत उभा आहे. तू माझा आहेस याचा अभिमान आणि आदर आहे. चांगले, वाईट आणि कुरूप अशा प्रत्येक गोष्टीला आपण एकत्र सामोरे जाऊ आणि शमशेराचे कलाकार आणि टीम यांचे खूप खूप अभिनंदन. प्रेक्षकांनी दिलेले प्रेम, काळजी आणि आशीर्वाद हे अमूल्य आहेत आणि आमच्यापासून हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत.”

आणखी वाचा-माझी चित्रपटांची निवड वडिलांना कधीच पटली नाही – रणबीर कपूर

दरम्यान ‘शमशेरा’ चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त, वाणी कपूर, रोनित रॉय, सौरभ शुक्ला असे अनेक स्टार कलाकार आहेत. १५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पाच दिवसांत ५० कोटीही कमवू शकला नाही. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘शमशेरा’च्या कमाईत सोमवारी ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी घसरण झाली. ‘शमशेरा’ने प्रदर्शनानंतर पाच दिवसांत केवळ ३६ कोटींची कमाई केली आहे.