कंगनाच्या आव्हानाला वासिम अक्रमच्या पत्नीनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाली…

“…तर मी ट्विटर कायमचं सोडेन”; कंगना रणौतनं विरोधकांना दिलं होतं आव्हान

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अलिकडेच तिने आपल्या विरोधकांना एक आव्हान दिलं होतं. ही लढाई कंगनाने सुरु केली, असं कोणी सिद्ध करुन दाखवलं तर ती ट्विटर कायमचं सोडून देईल असं ती म्हणाली होती. तिच्या या आव्हानाला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमच्या पत्नीने प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

“लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे असत्य आहे. आजवर कधीही मी स्वत:हून लढाई सुरु केलेली नाही. समोरुन आरोप झाल्यानंतरच मी प्रत्युत्तर दिलं आहे. या लढाईची सुरुवात माझ्यामुळे झाली हे जर कोणी सिद्ध करुन दाखवलं तर मी ट्विटर कायमचं सोडून देईन. ही लढाई कायमची संपवेन. भगवान श्री कृष्ण यांनी सांगितलय जर कोणी लढाईसाठी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाला नकार देऊ नका.” अशा आशयाचं ट्विट कंगना रणौतने केलं होतं. तिच्या या आव्हानाला वासिम अक्रमची पत्नी शानिएरा अक्रम हिने प्रत्युत्तर दिलं. “कदाचित भांडणाला तू सुरुवात करत नसशील, पण मदर तेरेसा यांच्यासारखी तू शांत देखील नाहीस.” अशा आशयाचं ट्विट करुन शानिएराने कंगनाला उपरोधिक टोला लगावला. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना?

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shaniera akram comment on kangana ranauts challenge mppg