राजस्थानमधील उदयपूर येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या घटनेनंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील उदयपूर हत्या प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Photos : अमृता फडणवीस यांच्या हटके लूकची चर्चा, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

prakash amedkar narendra modi
“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
prakash ambedkar uddhav thackeray sharad pawar
“फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून…”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला; जागावाटपावर म्हणाले…
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”

अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येक विषयावर आपलं मत ते खुलेपणाने मांडताना दिसतात. कर्करोगावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर ते सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असतात. उदयपूर हत्या प्रकरण घडल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आठवण झाली.

शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले?
शरद पोंक्षे यांनी यांनी वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या काही ओळींचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये असं म्हटलंय की, “प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्तान जगू शकेल.” शरद पोंक्षे यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं, “जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.”

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, फुफ्फुसाच्या आजारामुळे पतीचं निधन

उदयपूर हत्याप्रकरण नेमकं काय?
राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांकडून आंदोलन केले जात आहे. कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे.