शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही लोकांनी एकनाथ शिंदेंच्या या बंडाला पाठिंबा दिसतोय तर काही जणांचा विरोध. यासगळ्यात अभिनेता शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नकळत एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Viral Video Sister's dance on zingat song at brother's wedding girls stunning dance
Viral Video : भावाच्या लग्नात बहिणींचे झिंगाट नृत्य, तरुणींचा जबरदस्त डान्स एकदा बघाच
Why is cholesterol rising among the young
High Cholesterol : तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण का वाढत आहे? तज्ज्ञांनी सांगितले कारण

शरद पोंक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांच ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक दिसतं आहे. तर यासोबतच त्याच्या पाठी शरद पोंक्षें यांच्यासोबत एकनाथ शिंदे दिसत आहेत. या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असे लिहिले आहे.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

ही पोस्ट शेअर करत “कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय, दुसरं वादळ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात! एका झुंजीची गाथा! – शरद पोंक्षे, दोन महिन्यात दुसरी आवृत्ती!

आणखी वाचा : ‘I Love Uddhav…’, महाराष्ट्राच्या राजकारणावर लकी अली यांची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात पोस्ट करुन तो पाठिंबा-विरोध दर्शवत आहेत. आता मराठी अभिनेता जे हिंदुत्ववादी आहेत,सावरकरांच्या विचारांचे निष्ठावंत सेवक आहेत अन् गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे समर्थक आहेत असं वाटू लागलंय त्या शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला नकळत पाठिंबा देणारी एक पोस्ट केलेली आहे,ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.