scorecardresearch

“मुसलमान आपल्या देशाला हिंदुस्थान का म्हणतात?” शरद पोंक्षे यांनी सांगितलं यामागील कारण

प्रत्येक भाषणातून शरद पोंक्षे हिंदू धर्म, तसेच सावरकरांचे विचार स्पष्टपणे मांडत असतात

“मुसलमान आपल्या देशाला हिंदुस्थान का म्हणतात?” शरद पोंक्षे यांनी सांगितलं यामागील कारण
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. बऱ्याचदा त्यांच्या या मतांवर टीका होते तर काही लोक त्यांच्या मतांचं समर्थनही करतात.

शरद पोंक्षे हे कट्टर सावरकरवादी विचारसरणीचे आहेत हे सर्वश्रुत आहे शिवाय ते त्यांच्या प्रत्येक भाषणातून हिंदू धर्म, तसेच सावरकरांचे विचार स्पष्टपणे मांडत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्याच एका भाषणातील व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे यांनी आपण हिंदू या देशाला भारत म्हणतो, पण बहुतांश मुसलमान हे आपल्या देशाला अजूनही हिंदुस्थान म्हणतात यावर कटाक्ष टाकला आहे.

आणखी वाचा : चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या नथुरामची झलक पाहून प्रेक्षक उत्सुक; केली या महान अभिनेत्याशी तुलना

भाषणात शरद पोंक्षे म्हणाले, “आपण अधिकतम हिंदू आपल्या देशाला भारत म्हणतो, इंडिया म्हणतो. आपण स्वतःला भारतीय म्हणवून घेतो, पण अधिकतम मुसलमान हिंदुस्थान म्हणतात. त्यांना हा देश म्हणजे भारत किंवा इंडिया नाही वाटत, कारण त्यांना कळलं आहे की हे हिंदू लोकांचं स्थान आहे. आम्ही मात्र त्यांना खुश करण्यासाठी याला भारत म्हणतो. भारतीय म्हंटलं की सगळे येतात त्यात, हिंदुस्थान म्हंटलं की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो. त्यांना लाज वाटत नाही हिंदुस्थान म्हणायला, पण आपल्याला वाटते. त्यांना अजूनही त्यांचा माणूस दिल्लीच्या गादीवर बसत नाही ती सल त्यांच्या मनात सलतीये की हा हिंदुस्थान आहे.”

शरद पोंक्षे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही भरपूर काम केलं आहे. याबरोबरच त्यांच्या मालिकांमधल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाने शरद पोंक्षे यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हे नाटक आज सुरू नसलं तरी या अशा वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून शरद पोंक्षे हिंदू धर्माविषयी त्यांचे विचार मांडत असतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 11:51 IST

संबंधित बातम्या