देशभरात गाजलेला सोनी टीव्हीवरील रिअलिटी शो ‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी टीव्हीनं दुसऱ्या पर्वाचा प्रोमो नुकताच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून शेअर केला. जो सध्या बराच चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. बिझनेस आणि स्टार्टअपशी संबंधित हा पहिला रिअलिटी शो होता आणि त्याच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेमुळे तो देशभरात लोकप्रिय ठरला होता. आता त्याचं दुसरं पर्व येणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

प्रोमोची सुरुवात एका आशावादी कर्मचाऱ्यापासून होते. जो आपल्या बॉसनं त्याच्या नव्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी म्हणून त्याला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याचे प्रयत्न धुडकावून लावतो. त्याच वेळी एक आवाज येतो. ‘गुंतवणुकीसाठी चुकीच्या दरवाजे ठोठावणं बंद करा. पहिल्या पर्वाच्या तुफान यशानंतर शार्क टँक इंडियाचं दुसरं पर्व लवकरच येतंय.’

आणखी वाचा- डॉ. अमोल कोल्हे ‘शेर शिवराज’चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर संतापले, वाचा नेमकं काय घडलं

या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे शार्क अशनीर ग्रोवर, अनुपम मित्तल, अमन गुप्ता, विनीता सिंह, नमिता थापर, गजल अलघ आणि पीयूष बंसल यांनी ८५००० लोकांमधून काही काही नव्या उद्योजकांना निवडून ४२ कोटींचीं गुंतवणूक केली होती. याच प्रोमोमध्ये नव्या पर्वासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. सोबतच रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती देखील देण्यात आली आहे.

आणखी वाचा- जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात ED ची मोठी कारवाई, ७.२७ कोटीं संपत्ती जप्त, वाचा संपूर्ण प्रकरण

कोण करू शकतं रजिस्टर?
या शोमध्ये उद्योजक त्यांच्या नव्या संकल्पना ‘शार्क्स’च्या पॅनेलसमोर मांडतात. त्यानंतर जर त्या संकल्पना शार्क्सना आवडल्या तर ते त्यांच्या कंपनीमध्ये इक्विटीच्या बदल्यात गुंतवणूक करतात. जर तुम्ही एक नवोदित उद्योजक असाल आणि रिअलिटी शोमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही या शोसाठी रजिस्टर करू शकता.